दिपोत्सव..

Khozmaster
1 Min Read

दिपोत्सव ..

 

दिवाळी करी साजरी

वृद्धाश्रमात कधीतरी 

वाटे त्यांना सुखानंदे

आहोत आपल्या घरी

 

सजवावे आश्रम घरा

दीप उजळा परिसरी

वृध्द हात ते तालधरी

पहाट गाणी एकसुरी 

 

उटणे सुगंधी साबण

तैल मर्दन सेवा करी

मळ सारा अहंकारी

गळूनि पडे खरोखरी

 

सुरु होणार हिवाळा

द्यावी वस्त्रे नवी बरी

पांघरती स्नेहाळ प्रेम

नाही त्याची बरोबरी

 

सोसेल अशी फराळी

पंगतीला हवीत सारी

भुके पेक्षा शांती उरी

तृप्तता देईलं ढेकरी

 

दिपावली ही भरजरी

अनुभवा एकदा तरी

चिरकाल होई तृप्ती

प्रकाश उजळे अंतरी 

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६.

  www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *