अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीने दिले सोयगांव आगार प्रमुखाकडे निवेदन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत सोयगांव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील टिटवी, देव्हारी, डाभा, नादांतांडा व सावळदबारा या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी,रुग्ण, कर्मचारी हे दररोज बुलढाणा येथे शाळा, दवाखाना,महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिक्षण घेण्यासाठी जातात तरी या विद्यार्थ्याना येण्या जाण्याचे साधन हे फक्त लालपरी (बस) आहे.पण मागील काही दिवसांपासून या ग्रामीण भागात ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाल्याने गिरडाघाट पुर्णतः खराब झाला असल्याने त्याची दखल बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन तो घाटातील रस्ता चांगल्याप्रकारे डांबरीकरण करून दिला असला तरी या भागातील काही रस्त्याचे जास्तीत जास्त नुकसान झाले आहे.या भागातील नागरीकांच्या तक्रारीनुसार फर्दापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा खराब झालेल्या रस्त्याचे काम सुरू केले आले आहे. आणि लवकरच डांबरीकरण सुद्धा होईल असे आश्वासन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर राठोड यांनी सांगितले आहे.मात्र या भागातील नागरिकांना बुलढाणा जाण्यासाठी एकही बस नाही आणि बुलढाणा ते सावळदबारा केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहे औरंगाबाद जिल्ह्यात सावळदबारा हे गाव शेवटचे टोक आहे. औरंगाबाद जिल्हा सावळदबारा येथून १५० किलोमीटर अंतरावर आहे तर बुलढाणा ३५ कि.मी.तसेच सावळदबारा हे गाव चक्रधर स्वामीचे तिर्थक्षेत्र म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. पण बुलढाणा जाण्यासाठी बसच नाही याकरिता हि बस सोयगाव,सावळदबारा,गिरडाघाट मार्ग बुलढाणा चालू करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुणभाऊ चव्हाण, चेतन राठोड तालुका अध्यक्ष, गोकुळसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव यांनी सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे याकडे दि.२२/१०/२२ शनिवार रोजी देण्यात आले आहे. या आगारा तर्फे या वरील बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन दखल घ्यावी तसेच लवकर बस सोयगाव ते बुलढाणा या मार्गावर चालू करावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सरपंच ज्ञानेश्वर वारांगणे मोलखेडा, रा.काँग्रेसचे सुनील माकोंडे,उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 43