सोयगाव महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने नुकसानी पंचनामे अंतिम टप्प्यात

Khozmaster
2 Min Read

पंचेनामे सुरू होताच शेतकरी आनंदला;जि.प.स.गोपीचंद जाधव यांची माहिती सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत सोयगाव शहर व सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे कृषिमंत्री अब्दुल सतार यांनी स्वाता:शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून महसूल विभाग,मात्र कृषिमंत्री पाहणी करून तात्काळ पंचेनामे करण्याचे आदेश गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,महसूल विभाग व कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचेनामे सुरुवात केली आहे. शनिवार, रविवारी महसूल आणि कृषिचे पंचनामा पथके शिवारात जोमाने कामाला लागले आहे.यामुळे शेतकऱ्यांना खूपच दिलासा मिळाला आहे.तहसीलदार रमेश जसवंत,तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ व गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी स्वतः बनोटी मंडळात व सावळदबारा मंडळाने पंचनामे करण्याची कारवाई हाती घेतली पंचनामे अंतिम टप्प्यात आले पंचनामे करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री जरंडी, बनोटी ते फर्दापुर या भागाचा रात्री दहा वाजेपर्यंत नुकसानीची पाहणी दौरा केला. यावेळी कृषिमंत्र्यांच्या सोबतच ग्रामसेवक, महसूल कर्मचारी, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक कर्मचारी होते. सोयगाव तालुका पंचनामाचा अंतिम टप्प्यात आले आहे.यामधे जवळपास सोयगाव तालुक्यात ३४ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि लवकरच आठ ते दहा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल आणि कृषी विभागांनी यांनी पाठविला आला होता.यामध्ये सर्वाधिक पंचनाम्यांसाठी महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना आदेशीत करण्यात आले आहे तहसीलदार रमेश जसवंत यांनी पंचनाम्यांच्या प्राथमिक मोहीम हाती घेतली मात्र त्यानंतर पथके शेतीच्या बांधावर फिरकले होते शेतकऱ्यांच्या आता दिवाळी गोड झाली असून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या समाविष्ट झालेल्या सोयगाव तालुक्याला पंचनाम्यांच्या लवकरच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अशी माहिती जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *