सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे सर्व सामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने सोयगाव तालुक्यातील गरीब नागरिकांना प्रथमच साखर, चणाडाळ, रव,तेल अशा चार वस्तू आनंदाचा शिधा म्हणून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोफत सोयगाव तालुक्यात जाहीर केला आहे. आनंदाचा शिधा किट रेशन दुकानात व सोयगाव शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या रेशन दुकानात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे दिवाळी गेली खाली पण भाऊबीज च्या मुहूर्तावर आज दि.२५/१०/२२ मंगळवार रोजी दुपारी एक वाजता सरपंच भाऊराव कोलते पाटील,मा.सभापती शिवाआप्पा चोपडे, माजी उपसरपंच मुंकुदा मानकर, माजी सरपंच किसन सुर्यवंशी,पत्रकार गणेश खैरे,जेष्ठ नागरिक अशोक देशमुख यांच्या हस्ते आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात सुरुवात झाली. शिधापत्रिकाधारकांना मोफत आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले. सिल्लोड, सोयगाव मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना व कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आनंदाचा शिधा किट खरेदीसाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्यात आलेले आहे. रेशन दुकानदारांना शुल्क देऊ नये व आपापल्या रेशन दुकानातून मोफत आनंद किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृ.मा.सभापती शिवाआप्पा चोपडे यांनी आहे.याप्रसंगी मा.तहसीलदार रमेश जसवंत, पुरवठा नायब तहसीलदार,सरपंच भाऊराव कोलते पाटील, पो.पा.विलास कुल्ले, गणपत सुर्यवंशी, ग्रा.प.स.मोहन सुरडकर,प्रमोद साखरे,विजय आप्पा कुल्ले, प्रा.मनोज चोपडे, शेख बिसमिल्ला वायरमन, शेख फयाज भाई,शेख.मुनाफ भाई,पत्रकार गोकुळसिंग राजपूत, रहीमखाँन पठाण, जब्बार डी.तडवी, सुनील माकोंडे, आदींची उपस्थिती होती.उशिरा का होईना दिवाळी जरी गोड नाही तरी भाऊबीज हि गोड झाली आहे अशे गोरगरीब जनतेतून सूर निघत होता आणि आमची भाऊबीज हि गोड झाले आहे. ग्रामस्थांनी मानले कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे मानले आभार अशी माहिती प्रा.मनोज चोपडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Users Today : 43