सावळदबारा येथे चक्रधर स्वामी मंदिर जवळ हाय मास्ट लाईट चे उद्घाटन

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दिवाळी व पाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यात प्रसिद्ध असलेले महास्थान भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर सावळदबारा आज दिवाळीच्या निमित्त चक्रधर स्वामी मंदिर समोर शिवशाई एंटरप्राइजेसचे मालक चेतन मोरसिंग चव्हाण वाळूज पंढरपूर यांच्यातफेँ रा.नादांतांडा सावळदबारा मंदीरावर लाईट देण्यात आला आहे.अशे दहा ते बारा मिनी हाय मास्ट लाइट त्यांनी नादांतांडा येथे देण्यात येऊन बसविण्यात आलेले आहेत.त्याचा लोक अर्पण सोहळा भाजपाचे इद्ररीस मुलतानी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पुन्हा एक हाय मिनी लाइट सावळदबारा येथील स्मशानभूमीत देणार असल्याची माहिती त्यांनी जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना सांगितले. चक्रधर स्वामी मंदीरावर मिनी हाय मास्ट लाइट दीपदिवा लावून लोक अर्पण सोहळा सरपंच मोरसिंग दगडू चव्हाण नादांतांडा यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच मोरसिंग चव्हाण यांच्यास्व खर्चाने हाय मास्ट लाइट लावून दिला आहे.या हाय मास्ट लाईटचा भाविक भक्त व ग्रामस्थांना होणार येथे रात्रीच्या वेळी अंधार असायाचा याचा फायदा मंदीरावर येणाऱ्या यात्रेकरूंना जास्त लाभ होणार असल्याची माहिती भाजपचे जि.उपध्याक्ष औरंगाबाद जयप्रकाश चव्हाण यांनी सांगितले.यावेळी भाजपा जि.उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण,प्राचार्य पंजाबराव कोलते(पाटील) तसेच सरपंच भाऊराव कोलते, विनोद टिकारे,रामचंद चिमणकर, तालुका उपाध्यक्ष शांताराम खराटे,रा.काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मो.आरिफ मो.लुखमान, प्रा.दीपक चोपडे सर,अवतार चव्हाण, विष्णू भाऊ चव्हाण,प्रा.सुदाम जाधव, समाधान जाधव, भगवान तारापुरे,केशव आप्पा सवकर, दीपक मानकर, संजू राजपूत, मोहन सुरडकर,गजू भाऊ गट, संतोष राजपूत, मधुकर पुजारी, गोकुळसिंग राजपूत, रहीम भाऊ पठाण, जब्बार तडवी, पत्रकार व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शिवशाई एंटरप्राइजेसचे मालक चेतन मोरसिंग चव्हाण वाळूज औरंगाबाद यांचे मंदिराचे पुजारी मंडळी, मधुकर पुजारी व ग्रामस्थांनी आभार मानले.

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *