सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील घाणेगांव तांडा येथे सर्व सामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-सरकारने सोयगाव तालुक्यातील गरीब नागरिकांना प्रथमच साखर, चणाडाळ, रव,तेल अशा चार वस्तू आनंदाचा शिधा म्हणून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोफत सोयगाव तालुक्यात जाहीर केला आहे. आनंदाचा शिधा किट रेशन दुकानात व सोयगाव शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या रेशन दुकानात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे अशा प्रमाणेच घाणेगांव तांडा येथे सुरुवात झाली आहे.दिवाळी गेली खाली पण भाऊबीज च्या मुहूर्तावर आज दि.२५/१०/२२ मंगळवार रोजी दुपारी एक वाजता सरपंच सौ.रत्नाताई सुरेश चव्हाण, उपसरपंच अंजु जाधव,लक्ष्मण सुदाम पवार, ईश्वर ज्योतीराम चव्हाण, ग्रामसेवक एस.ए.रणसिंग, तंटामुक्ती अध्यक्ष, पो.पाटील, सरपंचपती सुरेश चव्हाण यांच्या हस्ते आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात सुरुवात झाली. शिधापत्रिकाधारकांना मोफत आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले. सिल्लोड, सोयगाव मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना व कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आनंदाचा शिधा किट खरेदीसाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्यात आलेले आहे. रेशन दुकानदारांना शुल्क देऊ नये व आपापल्या रेशन दुकानातून मोफत आनंद किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंचपती सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते)यांनी आहे.याप्रसंगी मा.तहसीलदार रमेश जसवंत, पुरवठा नायब तहसीलदार,सरपंच सरपंच रत्नाताई चव्हाण, अंजु जाधव उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य बबिता राठोड, मुक्ताबाई राठोड, जनाबाई पवार, करुणाबाई चव्हाण, लक्ष्मण पवार, महेश राठोड, लवकेश राठोड, गोपाल चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, सुरेश शेळके, ईश्वर चव्हाण, राजमल चव्हाण, सुभाष जाधव,रेशन दुकान मालक, पो.पाटील,पत्रकार सुनील चव्हाण, सचीन राठोड, अज्ञानसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.उशिरा का होईना दिवाळी जरी गोड नाही तरी भाऊबीज हि गोड झाली आहे अशे गोरगरीब जनतेतून सूर निघत होता आणि आमची भाऊबीज हि गोड झाले आहे. घाणेगांव तांडा येथील ग्रामस्थांनी मानले कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे मानले आभार अशी माहिती रेशन दुकानचे मालक आर.एम.चव्हाण दुकान नंबर १५ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Users Today : 43