सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील नादांतांडा येथे सर्व सामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-सरकारने सोयगाव तालुक्यातील गरीब नागरिकांना प्रथमच साखर, चणाडाळ, रव,तेल अशा चार वस्तू आनंदाचा शिधा म्हणून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोफत सोयगाव तालुक्यात जाहीर केला आहे. आनंदाचा शिधा किट रेशन दुकानात व सोयगाव शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या रेशन दुकानात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे अशा प्रमाणेच नादांतांडा येथे सुरुवात झाली आहे.दिवाळी गेली खाली पण भाऊबीज च्या मुहूर्तावर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता माजी सरपंच दारासिंग चव्हाण, देवीदास चव्हाण,सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण,ममराज जाधव, मानसिंग चव्हाण, फुलसिंग चव्हाण यांच्या हस्ते आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात सुरुवात झाली. शिधापत्रिकाधारकांना मोफत आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले. सिल्लोड, सोयगाव मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना व कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आनंदाचा शिधा किट खरेदीसाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्यात आलेले आहे. रेशन दुकानदारांना शुल्क देऊ नये व आपापल्या रेशन दुकानातून मोफत आनंद किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे.याप्रसंगी मा.तहसीलदार रमेश जसवंत, पुरवठा नायब तहसीलदार,रेशन दुकान मालक,बळीराम राठोड,हरलाल राठोड, मोहनसिंग जाधव, राजू चव्हाण, रामदास राठोड, मनोहर राठोड, काळू चव्हाण प्रकाश राठोड, पो.पाटील,पत्रकार सुनील चव्हाण, सचीन राठोड, अज्ञानसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.उशिरा का होईना दिवाळी जरी गोड नाही तरी भाऊबीज हि गोड झाली आहे अशे गोरगरीब जनतेतून सूर निघत होता आणि आमची भाऊबीज हि गोड झाले आहे. नादांतांडा येथील ग्रामस्थांनी मानले कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे मानले आभार अशी माहिती माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Users Today : 0