पातुर प्रतिनिधी ,रामेश्वर वाढी
पातुर येथील संगीत तज्ञ प्रा. विलास राऊत यांच्या पत्नी कर्तबगार नंदाताई विलास राऊत ह्या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या यासोबतच एक आदर्श आई म्हणून त्यांनी विशेष संस्कार दिला इतर महिलांना त्या प्रेरणादायी होत्या एकत्रित कुटुंब राष्ट्रभक्त कुटुंब या दृष्टीने अनेक महिलांना त्यांनी मार्गदर्शन करून राऊत परिवाराचा आदर्श संस्कार त्यांनी या ठिकाणी रुजवला प्रेरणादायी पत्नी म्हणून त्यांची खेती आहे त्यामुळे इतर महिला करता सौ नंदाताईंचा आदर्श हा प्रेरणादायी आहे असे विचार पातुर येथील ज्येष्ठ विचारवंत कवी उद्योजक समाजसेवक छोटू भाऊ उर्फ सूर्यकांत जोशी यांनी व्यक्त केले
पातुर येथे संगीत तज्ञ प्राध्यापक विलास राऊत यांचे निवासस्थानी सौ नंदाताई राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी सौ नंदाताई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करून त्यांच्या आदर्श कार्यावर प्रकाश टाकून विचार व्यक्त केले
यावेळी ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले, माजी मुख्याध्यापक रमेश काळपांडे, कवी प्रा विठोबा गवई, प्रा. सौ करुणाताई गवई यांनी
सौ नंदाताई राऊत यांच्या स्मृतींना उजाळा देऊन आपली मनोगते व्यक्त केलीत
याप्रसंगी राऊत परिवारातील ज्येष्ठ माजी मुख्याध्यापक सुधाकर राऊत,सौ मनोरमाताई राऊत,
प्रा विलासराव राऊत, संजय राऊत, विनायक राऊत, मंगेश राऊत,सौ. अंकिता राऊत ,सौरभ राऊत यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती
होती.
Users Today : 8