माॅडर्न बाप …

Khozmaster
1 Min Read

माॅडर्न बाप …

आकृती साचे बंद

कडक करारी बाप

कोरडा गंभीर उग्र

मनात तया संताप

 

घरात सदैव दुर्लक्ष

कामाचाभलाव्याप

दरारा आणे शहारा

ओढला बंदूक चाप

 

बदलू लागे प्रतिमा

बनतोयं डॅडा पाॅप

ममा पेक्षा जवळचा

बाबूश भलता टाॅप

 

आई पेक्षा बाबाकडे

लहानगा टाके झाप

माॅमची शिस्तकडक

डॅडकडे सगळे माफ

 

कुछभी मांगोमिलेगा

उघडे डॅडीज् शाॅप

रे समजू उमजू घेतो

होता कधीही ऑफ

 

आई लुडबुड करते

उगा डोक्याला ताप

पाॅप माझा लाडाचा

खपवून घेतो प्रताप

 

नाळअदृश्य नात्यास

आईडी असे वा बाप

दोघांचे सदैव शोभते

छत्र डोक्यावर टाॅप

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६

  www.kavyakusum.com

 

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *