सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील वरखेडी तांडा येथे सर्व सामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-सरकारने सोयगाव तालुक्यातील गरीब नागरिकांना प्रथमच साखर, चणाडाळ, रव,तेल अशा चार वस्तू आनंदाचा शिधा म्हणून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोफत सोयगाव तालुक्यात जाहीर केला आहे. आनंदाचा शिधा किट रेशन दुकानात व सोयगाव शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या रेशन दुकानात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यात सुरुवात झाली आहे अशा प्रमाणेच वरखेडी तांडा येथे जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. दिवाळी गेली खाली पण भाऊबीज च्या मुहूर्तावर आज दि.२५/१०/२२ मंगळवार रोजी दुपारी एक वाजता सोयगाव शिवसेना कार्यालय प्रमुख मा.बबलूशेट हाजी,जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, सरपंच यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.शिधापत्रिकाधारकांना मोफत आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले. सिल्लोड, सोयगाव मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना व कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आनंदाचा शिधा किट खरेदीसाठी आवश्यक असलेले शुल्क भरण्यात आलेले आहे. रेशन दुकानदारांना शुल्क देऊ नये व आपापल्या रेशन दुकानातून मोफत आनंद किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा.बबलूशेट हाजी साहेब सोयगाव.यांनी केले आहे.याप्रसंगी मा.तहसीलदार रमेश जसवंत, पुरवठा नायब तहसीलदार,चेअरमन चरण जाधव, सोना चव्हाण, सुरेश राठोड, ओंकार राठोड, राजाराम जाधव, देवचंद जाधव, हिरा जाधव,रेशन दुकान मालक इरफान पठाण,प्रदीप जाधव आदींची उपस्थिती होती.उशिरा का होईना दिवाळी जरी गोड नाही तरी भाऊबीज हि गोड झाली आहे अशे गोरगरीब जनतेतून सूर निघत होता आणि आमची भाऊबीज हि गोड झाले आहे. वरखेडी येथील ग्रामस्थांनी मानले कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे आभार अशी माहिती जि.फ.सदस्य गोपीचंद जाधव, यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Users Today : 0