साई…
शिरडीत येता क्षणी
स्थान महात्म्य कळते
बाबांच्या मंदिरा कडे
पाऊल सहज वळते
कफनीत साधं रूप
दिसते साई विरक्ती
पायावर टेकवा डोके
जाणवे अद्भूत शक्ती
जमवलेली संपत्ती
चरणी देता ओतून
साई म्हणे नकोकाही
भक्ती हवीय आतून
साईनाथांच्या धुनीत
षडरिपु जळून खाक
प्रांक्तन बदलून जाई
मस्तकी लागता राख
बाबा दळायचे स्वतः
पावन झालं ते जातं
समान सारे शिर्डीत
इथे नाही धर्म जात
निर्वाण समयी साई
राहिले द्वारका माई
थांबता तिथे अंमळ
दुःख विलयास जाई
तिन्ही जगाची आई
भिक्षा मागूनि खाई
झोळी पसरली माझी
मज भिक्षा देहि साई
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 6