दिवाळी सुटीत दहा हजार नागरिकांनी लावली लेणीत हजेरी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील यंदा ऐन दिवाळी सुटीत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. आज शुक्रवारी दहा हजार पर्यटकांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी अजिंठा लेणी व लेणीचा परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता.सलग दोन वर्षापासून कोरोनाचे संकट ओढवल्याने येथील व्यावसायिक हतबल झाले होते. यावेळेसही म्हणावा तसा धंदा व्यापार व्यवस्थित नाही परंतु, व्यापारी करीत आहेत. पर्यटक लेणीस भेट देत असल्याने आम्ही समाधानी आहेत. असे येथील व्यावसायिक सांगत आहेत. आमचा व्यापार या वर्षी नाहीतर पुढच्या वर्षी होईल; परंतु पर्यटक आले नाहीतर आमच्यावर उपासमार होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. आशा परिस्थितीत व्यावसायिकांचे दुकान भाडे माफ करावेत, अशी मागणी ते करीत आहेत. आमचा पर्यटनमंत्र्यांनी यावर विचार करावा, अशी मागणी व्यापारी करीत आहे.सुट्याच्या काळात पर्यटन वाढल्याने उत्पन्नात भर पडली आहे. पर्यटन महामंडळास सुविधा कर व वाहनतळ यामुळे गेल्या दोन दिवसांत सव्वालाखाचे उत्पन्न झाल्याचे पर्यटन महामंडळचे व्यवस्थापक रामदास क्षीरसागर यांनी सांगितले. पर्यटन महामंडळचे अजिंठा लेणीतील उपाहारगृह पर्यटनमुळे चांगला व्यवसाय होत असल्याचे येथील व्यवस्थापक राज पाटील यानी सांगितले. यावेळेस विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशी पर्यटकांची संख्या जास्त प्रमाणात होती. असे येथील कार्यकारी संपादक प्रवीण तायडे यांनी सांगितले. गदीँ चा फायदा घेऊन काही गैरप्रकार घडू नये यासाठी फर्दापूर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक रंजीत कासले,पो.ना.निलेश लोखंडे, विनोद कोळी, बेदारकर,तडवी, ठाकरे, आनंद पगारे,पोलिस महिला कल्पना चाथे,कविता चाथे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Users Today : 0