इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी रहीम खान पठाण यांची निवड

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील पत्रकार रहीमखाँन पठाण यांची इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन-रहीम खान पठाण रांजणी/असलम कुरेशी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी सोयगांवचे पत्रकार दैनिक जगमित्र तसेच जी नाईन महाराष्ट्र चॅनेलचे पत्रकार रहीम खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार तसेच मराठवाडा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने मराठवाडा प्रदेश महासचिव व्यंकटेश सूर्यवंशी यांनी रहीम खान पठाण यांची नियुक्ती केली आहे. त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशमध्ये शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे. नियुक्तीनंतर रहीम खान पठाण यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.रहीम खान पठाण यांच्या नियुक्तीबद्दल मोहम्मद परवेज़, गिरिराज सिंह, सलमान अहमद, सनोबर अली कुरेशी एडवोकेट, रंजीत सम्राट, मो.एजाजुल हक, मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, के.एम. राज, विजय मद्देशिया, जावेद पठाण (प्रदेश कोषाध्यक्ष मराठवाडा), शेख नबी सिपोराकर (मराठवाडा उपाध्यक्ष), देवेंद्र योगेन्द्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), हाजी मोहम्मद तारिक शेख (जिल्हा अध्यक्ष नागपुर), फारूख शेख (जिल्हा अध्यक्ष, जळगांव), प्रा. लुकमान कुरेशी (जिल्हा अध्यक्ष, बुलढाणा), शकील अहमद (जिल्हा अध्यक्ष, परभणी), तौफिक कुरेशी (जिल्हा अध्यक्ष लातूर), सैय्यद मिन्हाजउद्दीन (जिल्हा अध्यक्ष, बीड), अयाज अहमद खान (जिल्हा अध्यक्ष, मुंबई), जैनोद्दीन पटेल (जिल्हा अध्यक्ष, नांदेड), फय्याज कुरेशी (जिल्हा अध्यक्ष, वाशिम), अनिल खडसे (जिल्हा अध्यक्ष हिंगोली), शेख वज़ीर (जिल्हा अध्यक्ष अहमदनगर), शेख उमर (जिल्हा अध्यक्ष जालना), कृष्णा रौराले, लक्ष्मण राजुरकर, शबाब बागवान (उपसंपादक जगमित्र), सुनील चोरमाले (झुम ऑन), जेष्ठ पत्रकार गोकुलसिंह राजपूत उपसंपादक (आनंद नगरी), सुनील चव्हाण (दख्खन), गणेश खैरे (तरुण भारत), जब्बार तडवी (एन.टी.व्ही. न्यूज मराठी) आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *