उपविभागीय अधिकारी जंगम यांचे स्वागतऔरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयाला अखेर नियमित उपविभागीय अधिकारी मिळाले आहे.मंगळवारी रोजी उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार स्वीकारला. त्यामुळे सर्वसामान्यांची रेंगाळलेली कामे आता मार्गी लागणार आहे. उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या बदलीनंतर या कार्यालयाला नियमित अधिकारी मिळाला नाही. संजीव मोरे, संदीप पाटील हे अतिरिक्त अधिकारी मिळाले. आता नियमित उपविभागीय अधिकारी मिळाल्याने सर्वसामान्यांची कामे सुलभतेने होणार आहे. यासह अवैद्य वाळू वाहतुकीला लगाम लावण्याचे आवाहन कुलदीप जंगम यांच्यासमोर असणार आहे. पदभार घेतल्यानंतर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्कर घायवट पाटील, शहराध्यक्ष शेख फेरोज, देविदास दांडगे, संजय आरके, शेख फेरोज मेवाती, अजमेर कुरेशी, गुलाब शहा, शकील खाँ पठाण, गणेश आरके,सुनील माकोंडे आदींनी जंगम यांची भेट घेत स्वागत केले.
Users Today : 0