निंबायती येथे माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम शेतकरी संवाद

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम दि.२९/१०/२२ रविवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय निंबायती येथे सोयगाव कृषी विभागाचे मा. तालुका कृषी अधिकारी श्री एस जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. मंडळ कृषी अधिकारी तथा कृषी पर्यवेक्षक श्री जे के जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मौजे निंबायती येथे घेण्यात आला. यावेळी मंडळ कृषि अधिकारी जे के जाधव यांनी महाडीबीटी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ,मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले तसेच कृषि सहाय्यक परीक्षित पाटील यांनी हवामान आधारित फळपिक विमा,पी एम किसान योजना, इत्यादी योजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या सदर कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *