श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या नंदीच्या मुर्तीचे संवर्धन व्हावे – शिवभक्त रंगनाथ महाराज

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत: पहूर,देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या शिवकालीन श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या नंदीच्या मूर्तीचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे,दि.३०/१०/२२ रोजी अशे प्रतिपादन श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले.गेल्या २१ वर्षांपूर्वी सन २००१ मध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू असताना देवळी आणि गोगडी नदीच्या संगमावर काही कृष्णा रामदास विसपुते हे झऱ्यातून पाणी भरत असताना त्यांना घडीव दगड दृष्टीस पडला . त्यांनी लगेचच मंदिराचे पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या कानी वार्ता दिली . महाराजांनी तत्काळ भाविकांच्या सहकार्याने नदीपात्रात उत्खनन केले असता नंदीची दगडी मूर्ती आढळून आली . सदर मूर्तीचे शिर आक्रमणामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे कालौघात भग्न झाले असल्याचे जाणकार सांगतात . सुर्वणकार समाज अध्यक्ष संजय सोनार , रामकृष्ण जगताप यांच्या सह भाविकांनी दोर बांधून मूर्तीला मंदिरा जवळ आणले व त्याची पूजा केली . दरम्यानच्या काळात सदर मूर्ती मंदिरामागील बाजूस ठेवलेली होती . विजया दशमी पासून मंदिर विकासासाठी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी आजन्म भिक्षा झोळीचा संकल्प केलेला असून त्याद्वारे विविध विकास कामे होत असून नंदीची ही दगडी मुर्ती श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचा ऐतिहासिक ठेवा तसेच ती मुर्ती इतिहासाची एक साक्ष आहे , त्यामुळे सदर मूर्तीचे संवर्धन व संरक्षण होणे काळाची गरज असल्याचे मंदिराचे पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी सांगितले . सदर मुर्तीची भाविकांच्या हस्ते पूजा करण्यात आली.अशी माहिती प्रा.शंकर भांबरे यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *