औषध (विषारी बुरशीनाशक) बियाण्यास लावताना काळजी घ्यावी; मानसिंग भोळे(कृषी सहाय्यक)

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पेरतेवेळी प्रक्रिया करण्याची पद्धत बुरशीनाशकांची विषारी औषधाची प्रक्रिया केल्या नंतरच बियाण्याची पेरणी करावी.अशे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक मानसिंग भोळे(राजपूत) तथा माजी सैनिक यांनी सोयगाव तालुका व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे.बियाण्याची बिजप्रक्रिया करतेवेळी बुरशीनाशक हे कोणत्याही कंपनीचे असो पण बुरशीनाशक औषधाची प्रक्रिया करण्यात येत नाही.बुरशीनाशकांची असलेली प्लॉस्टीकची पुडी बियाण्याच्या पिशवीमध्ये ठेवलेली आहे. बियाणे प्रक्रिया करिता २.५ ग्रॅम बुरशीनाशकांची प्रती १ किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास लावावे. पुडीतील बुरशीनाशकांची पावडर थोडी ओलसर करुन सर्व बियाण्यास अतिशय हलक्या हाताने चोळावी किंवा लावण्यात यावी. बियाणे थोडा वेळ सावलीमध्ये सुकू द्यावे व नंतर प्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी करावी. जिवाणु संवर्धनाची प्रक्रिया करावयाची असल्यास बुरशीनाशकांची व जिवाणु संवर्धक एकाच वेळी किंवा सोबत लावु नये. पेरणीच्या पुर्वी शिफारशी प्रमाणे. संवर्धकाची प्रक्रिया करुन ताबडतोब पेरणी करावी.अशे आवाहन कृषी सहाय्यक मानसिंग राजपूत सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे. हे विषारी औषध असल्यामुळे बियाण्यास लावतांना त्वचेस लागु नये म्हणुन रबरी/प्लॉस्टीक हात मोजांचा वापर करावा. औषध नाका तोंडास व डोळ्यात जावू नये म्हणुन नाका तोंडास कापड बांधावे व डोळ्यास चष्मा लावावा. बियाण्याला औषध लावण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर हात, पाय, तोंड साबनाने व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.बुरशीनाशकांची प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा कोणत्याही खाद्य वा तेलाकरिता उपयोग करु नये.शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.अशी माहिती “साप्ताहिक आपले ज्ञानपंख”या वृत्त पत्राचे तालुका प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना कृषी सहाय्यक मानसिंग भोळे (राजपूत) सोयगाव कृषी विभाग यांनी सांगितले.

 

0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *