तालुका प्रतिनिधी तेल्हारा;रितेश कुमार टीलावत -हिवरखेड येथील भूषण नरेश टीलावत ह्या विद्यार्थ्याने स्टाफ सिलेक्शन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला तर देशातून एकतीसावा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले.त्याच्या या यशाबद्दल विध्यार्थ्यांचा नेहमीच गुणगौरव करणाऱ्या लोकजागर मंच या सामाजिक संघटनेने त्याचा व त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला.भूषणची निवड केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनिअर इंजिनिअर म्हणून झाली आहे.भूषण हा इलेक्ट्रिक इंजिनिअर असून अतिशय हुशार व मेहनती आहे.यावेळी लोकजागर मंचचे हिवरखेड अध्यक्ष महेंद्र कराळे,उपाध्यक्ष सुरेश ओंकारे,विलास घुंगड,सुभाष कसुरकार, सुरेश कराळे,निखिल भड, पंकज देशमुख,गौतम इंगळे,दानिश खान,संतोष गावंडे,प्रवीण गावंडे,गौरव गावंडे, अमोल दामधर, सागर खारोडे,सागर कसुरकार, फारूक खान,राजेश टाले,रितेश टीलावत,स्वराज भांबुरकर, अजिंक्य कराळे इ.उपस्थित होते.भूषणचे आई वडील प्राथमिक शिक्षक असून त्याच्या या यशाबद्दल लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Users Today : 18