सोयगाव प्रतिनिधी ,गोकुळसिंग राजपूत
सोयगाव व सावळदबारा परिसरातील कोणतीही नवीन नोट अथवा डॉलर चलनात आणायचे की बाद करायचे, हे रिझर्व्ह बँक ठरवत असते, चलनातून नोट किंवा डॉलर बंद करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक तशी अधिसूचना काढत असते; परंतु सध्या अशा कोणत्याही प्रकारची आदी सूचना जाहीर नसताना पाच रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचे साहस दुकानदार व व्यापारी यांनी परस्पर स्वनिर्णयाने केले असून, थेट रिझर्व्ह बँकेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शैक्षणिक वस्तू अथवा चॉकलेट, बिस्कीट घेताना पाच रुपयांची नोट मुलांना दिल्यावर ती स्विकारण्यास दुकानदारांनी नकार दिल्यावर पालकांना माहीत झाले. याबाबत वरिष्ठांनी दुकानदारास विचारले असता आम्ही घेतो हो; पण पुढे व्यापारी आमच्याकडून घेत नसल्याने पाच रुपयांची नोट घेण्यास असमर्थता दाखवली आहे. सध्या पाच रुपयांच्या नोटेबाबत वादंग सुरू आहे. पाच रुपयांची नोट चलनातून बंद झाल्याची ही अफवाच असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. तसेच पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीदेखील जनतेतून होत आहे. एक सरकारी चलन न स्वीकारणे व नोट चालत नसल्याची अफवा पसरवणे या दोन्ही गुन्ह्याची कारवाई करावी, अशी थेट जनतेतूनच मागणी होऊ लागली आहे. सध्या पाच रुपयांची नोट पाकिटात साठवण किंवा आठवण ठेवण्यात जनतेला धन्यता मानवी लागत आहे.
एक-दीड वर्षापासून व्यवहारात पाच रुपयांची नोट दिसत नाही. त्यामुळे मीदेखील ती स्वीकारत नाही. अशा सांगोपांगीने चर्चेतून दुकानदार, व्यापारी चलनातील पाच रुपयाच्या नोटांना व्यवहारातून हद्दपार केल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण मात्र कुणीच सांगू शकत नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे ज्यांच्याजवळ त्या नोट असतील त्यांनी फेकून द्याव्यात का फेकल्यास चलनाची अवहेलन केल्याचा गुन्हा दाखल होण्याची भीत अशा चक्रात नागरिक अडकले आहेत.
दुकानदारांकडून टाळाटाळ, ग्राहकांना त्रास
पाच रुपयांची नोट चलनातून बाद केल्याची अधिसूचना नसतानादेखील याचा • परस्पर निर्णय सर्वच व्यावसायिक व ग्राहकांनी घेतल्याचे जाणवून येत आहे. चुकून जरी एखादा ग्राहक पाचची नोट घेऊन काही खरेदीसाठी दुकानात किंवा संबंधित ठिकाणी गेला, तर व्यावसायिक अथवा दुकानदाराकडून पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याचे सांगून नोट घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बहुतेकवेळेस व्यावसायिक व ग्राहकांमध्ये पाचची नोट देवाण-घेवाणीवरून वाद निर्माण होताना दिसून येतात.
महेशसिंह ठाकूर ग्राहक शेतकरी देव्हारी ता सोयगाव
Users Today : 26