औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला मंजुरी मिळाली आहे. आमठाणा येथे मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी परिसरातील २० ते २५ गावांचा दररोज संपर्क येतो. येथे एकही मोठी बँक नसल्याने व्यापारी,शेतकरी,नोकरदार, ग्रामस्थांची अडचण होत होती. येथील ग्रामस्थांना नाइलाजाने सिल्लोड, भराडी, घाटनांद्रा या ठिकाणी व्यवहारासाठी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन दिलीप दाणेकर, अशोक गरुड, काकासाहेब मोरे, अरुण मोरे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना निवेदन देऊन या ठिकाणी बँक सुरू करण्याची मागणी केली होती.अखेर या मागणीला ग्रामस्थांना यश मिळाले आहे. मागणीचव त्यानुसार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नवीन शाखेला मंजुरी मिळाली आहे.आमठाणा येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
Users Today : 12