सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील निमखेडी येथे सोयगाव कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मौजे निमखेडी तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे सोयगाव तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना व जनावरांना याचा खुप फायदे होणार आहेत.पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून रब्बी हंगामात गहू, हरभरा, भूईमूग व मका पिकांना याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. व उन्हाळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरिता लोकसहभागातून कृषी विभागामार्फत तालुक्यात वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे.काही कामे चालू असून काही कामे पूर्ण झाली आहेत या कामी गावातील शेतकरी बंधूंनी कृषी विभागासोबत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ.यांनी व्यक्त केली.
Users Today : 5