फर्दापूर येथे संशयितरित्या वाहनातून तांब्याच्या केबल जप्त

Khozmaster
2 Min Read

सपोनि देविदास वाघमोडे यांची धडाकेबाज मोठी कारवाई सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे संशयितरित्या फिरत असलेल्या वाहनाचा पाठलाग करून पकडण्यात आले यश पकडण्यात आलेल्या तांब्याच्या केबल पट्टय़ांबाबत माहिती खालीलप्रमाणे सपोनी डी.बी. वाघमोडे हे सिल्लोड उपविभागामध्ये रात्रगस्त रात्रगस्त करीत असताना त्यांना पो.स्टे. फर्दापूर हद्दीत एक फोर्स ट्रॅक्स चारचाकी वाहन संशयितरित्या फिरत असल्याची माहीती मिळल्याने त्यास पंचासमक्ष चेक केले असता सदर वाहन चकवा देत अेाेरंगाबाद च्या दिशेने वेगाने निघाले. त्यास पाठलाग करुन पकडले असता. त्यातील दोन ईसम वाहनातुन बाहेर येवून विचारपुस केली असता अंधाराचा फायदा घेवुन दोघेजण पळुन गेले. त्यांचा पोलीस स्टाफ व इतर रात्रगस्त अधिकारी अंमलदार यांच्यामधून शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. वाहनचालकास पकडुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अंकुश लक्ष्मण गरड रा. नरापूर ता.पुर्णा जिल्हा परभणी असे सांगितले. पंचासमक्ष सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये 1)तांब्याची केबल 14 कॉपर बंडल वजन एकूण 291.400 kg यांची बाजारभावाप्रमाणे किंमत 160270 रु.2)काळ्या रंगाचा लोकरी 15 घोगड्या एकूण किंमत 7500 रु.3)2 मोबाईल ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 5000 रु.व जिओ फोन 700 रुपयाचा 4)फोर्स ट्रॅक्स पांढऱ्या रंगाची किंमत 10,00000 रु असा एकून 1179770 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला वरील प्रमाणे मुद्देमाल बाबत आरोपितास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, सदर आरोपी हे सुर्यास्त ते सूर्योदय दरम्यान संशयास्पद हालचाली करीत असताना चोरीचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिळून आले असून त्यांच्याकडे मिळून आलेल्या वरील मुद्देमाल मला मालकी हक्काबाबत कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नाहीत. त्यांच्याकडे मिळून आलेला मुद्देमाल हा सूरीचा असल्याचा दाट संशय आहे म्हणून एकुण तीन त्यांच्याविरूध्द गुरन 154)2022 कलम 122 क,124 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोउपनी कासले यांचेकडे देण्यात आला. सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक साहेब श्री. मनीष कलवानिया साहेब व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजयकुमार मराठे साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये सहायक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलिस नाईक नीलेश लोखंडे, पोलीस अंमलदार सतीश हिवाळे , भरत कोळी, प्रकाश कोळी यांच्या पथकाने केली आहे .

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *