दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी पोलीस अधीक्षक यांना मेहकर ता. मोळी गाव येथे जातीवादी गावगुंडा विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले मेहकर तालुका येथील मोळी गावात तोरणाखाली बैल नको म्हणत पोळासना निमित्त सर्व गावकरी पोळा सण साजरा करीत असताना तोरणाखाली महाराचा बैल नको म्हणत काही जातीवादी गावगुंड यांनी विरोध करून जातीवादी शिवीगाळ करून लाठ्या काठ्याने वृद्ध महिला व पुरुषांना मारहाण करण्यात आले असून आमच्या आई बहिणींना मारहाण केली जात आहे आम्ही संविधान मानणारे लोक आहे. जर आम्ही कायदा व्यवस्था बाजूला ठेवला तर आम्ही जसे चे तसे उत्तर देऊ पण संविधान आमच्या बापाने लिहिला आहे म्हणून आम्ही संयम पाळतो. सरकारने आमचा अंत पाहू नये त्या पिढींताना जर न्याय मिळाला नाही पोलीस अधीक्षक यांनी मोळी गावातील गावगुंडे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना गावातुन तडीपार करा अन्यथा रिपब्लिकन सेना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे दलित समाज हा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यास गेले असता त्यांना पोलीस प्रशासन त्यांना उडवडीचे उत्तर देऊन पोलीस स्टेशन मधून हाकलून देतात अशा पोलीस प्रशासनावर व ठाणेदारावर पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, तालुका अध्यक्ष श्याम लहाने, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, कामगार जिल्हाध्यक्ष सुरेश इंगळे, शहर कार्याध्यक्ष सतीश इंगळे, संजय मोहिते व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 16