इंद्रगढी यात्रेतील भाविकांसाठी अग्निशमन दलासह फिरते शौचालय: अब्दुल समीर

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी औरंगाबाद   –गोकुळसिंग राजपूत कन्नड तालुक्यातील घाटनांद्रा येथील इंद्रगढी देवी येथे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला दि. ७/११/२२ सोमवार नोव्हेंबर रोजी भव्य यात्रा उत्सव साजरा होणार आहे. यात्रे दरम्यान भाविकांच्या सोयी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने अग्निशमन दलासह फिरते शौचालयाची सुविधा देणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी दिली. घाटनांद्रा येथून जवळच असलेल्या सागमाळ शिवारातील जगदंबा इंद्रगढी देवीचा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा उत्सव साजरा होतो. कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षांनंतर यात्रा उत्सव साजरा होणार असल्याने यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांची वाढती गर्दी पाहता ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड नगर परिषदेकडे स्वच्छता व सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व साधन सामग्री उपलब्ध आहे. यापूर्वी देखील श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा धोत्रा, श्री म्हसोबा महाराज यात्रा सिल्लोड, मुरडेश्वर संस्थान केळगाव, उंडनगाव आदी ठिकाणी ग्रामपंचायत व देवस्थान ने केलेल्या मागणीनुसार सिल्लोड नगर परिषदेने अग्निशमन दल, फिरते शौचालय, घंटा गाड्या, पिण्याचे पाणी आदी सुविधा यात्रे दरम्यान भाविकांना दिल्या असल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर बोलताना सांगितले अशी माहिती सरपंच सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते)घाणेगांव तांडा ता सोयगाव यांनी दिली.

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *