विभागीय लोकशाही दिनाचे 14 नोव्हेंबर रोजी आयोजन

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत विभागीयस्तरावरील लोकशाही दिनाचे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज १५ दिवस आधी विहित नमुना प्रपत्र – १ (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहे. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र – १ (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात.

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *