कन्नड शहरातील एका इंग्रजी शाळेतील प्रताप औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शाळेची फी भरली नाही म्हणून येथील शाळेतील नर्सरी ते दहावीतील जवळपास ५० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर | काढल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास वर्गाबाहेर उभे केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी स्थानिक पदधिकाऱ्यांच्या मदत घेतल्याने शाळा व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांत गुरुवारी जोरदार संघर्ष झाला.कन्नड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी ते १० पर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये गरिब-गरजू सफाई कामगार, शेतकरी रिक्षावाल्यापासून मोठ्या श्रीमंतांपर्यंतची मुले शिक्षण घेत आहेत. कधी भरमसाठ करण्यात आलेली फी वाढ आणि संस्थेने चालविलेल्या मनमानी कारभारामुळे येथील विद्यार्थी पालक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळापासून थकित असलेल्या गरीब विद्यार्थी, पालकांना शाळेकडून सातत्याने अपम नास्पद वागणूक दिली जात आहे. त्याविरोधात याआधीच पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे.यामध्ये आजच्या घटनेची भर पडली आहे. गुरुवारी सकाळीच शाळा सुरू होताच शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी नर्सरी ते १० वी तील जवळपास ५० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. ज्याच्या पालकासोबत संपर्क झाला त्या विद्यार्थ्यांना वर्गात घेतले परंतु काही पालकासोबत संपर्क झाला त्या विद्यार्थ्यांना मात्र फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना दोन तास बाहेर उभे करत विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी अपमानीत केले. यामुळे पालकांनी व स्थानिकच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनालाच जाब विचारला. यामुळे पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अखेर वाद टळला. ▪️तक्रार आल्यास नक्कीच कारवाई फिसाठी जर कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत असेल तर चुकीचे आहे. शाळेना जे काही नियम घालून दिले त्या पध्दतीने शाळेने फिस घ्यावी मात्र विद्यार्थ्यांना असे अपमानित करणे चुकीचे आहे. अद्याप पालकांची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसुन तक्रार आल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल. दिलीप शिरसाठ, गटशिक्षणाधिकारी कन्नड ▪️केवळ फिससाठीची होणारी हेळसांड थांबवावी- मला शहरातील व खेड्यावरील विद्यार्थ्याच्या पालकांचे फोन आले. आम्ही बाहेर असल्याम ळे आपण शाळेत जाऊन बघा. मी शाळेत गेलो तर मुल मोठ मोठ्याने रडत होती. मी त्यांना विचारले त्या विद्यार्थ्यांनी सांगितले कि, आज आमचे पेपर आहे तरी आम्हाला पेपर देत नसल्याचे सांगितले. जे पालक पैसे भरत नसतील त्यांना नोटीसा द्या, फोन करा, मॅसेस करा पण पाठीवर दप्तराचे ओझे ठेवून मुलांना तास तास उभे करुन मुलांचे जीव घेऊन पैसे घेऊ नका असे मी मुख्याध्यापिका यांना सांगितले. मी पोलिसांना फोन केल्यावर विद्यार्थ्यांना पेपर | दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांची केवळ फिससाठीची होणारी हेळसांड थांबवावी. – काकासाहेब कवडे (नगरसेवक कन्नड)
Users Today : 12