रब्बी हंगाम पूर्वतयारी सोयगाव तालुक्यात बिज प्रक्रिया मोहिमेस वेग

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत                 रब्बी हंगाम बिज प्रक्रिया मोहिमेस आला वेग सोयगाव तालुक्यात एस जी वाघ सोयगाव तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेग घेतला असून गावा गावात कृषि सहाय्यक बिज प्रक्रियेची प्रत्यक्षिके घेत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे यात बियानास औषध बियाण्यास लावताना काळजी काय काळजी घ्यावी. कृ.स. ए.एस. बावस्कर,एस.एस.चव्हाण यांनी आपल्या शेतात बियाण्यास बिज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याची पेरणी करावी.असे आवाहन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने कृषि सहाय्यक धनवट, जंगला तांडा,सोयगाव मंडळातील शेतकऱ्यांना केले.ज्वारी बियाण्याची बीजप्रक्रिया करतेवेळी बुरशिनाशक 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.जेणेकरून काणी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही बियाणे जास्त ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.20-25 मि.सावलीत वाळवावे.जिवाणू संघ 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. एन.पी. के. स्थिर करणारे उत्पादनात 15-20% वाढ होते. ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक बुरशीना अटकाव निर्माण करते. अगोदर पेरणी केल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.20.20.0.हे खत ज्वारीच्या पेरणी करताना वापरावे.जिवाणू संवर्धक व बुरशी नाशकांची एकाच वेळी किवा सोबत लावू नये.पेरणीच्या पूर्वी शिफारस केल्याप्रमाणे संवर्धकाची प्रक्रिया करून ताबडतोब पेरणी करावी असे कृषि सहाय्यक एस एस चव्हाण यांनी शेतकऱ्यांना सांगितले.विषारी औषध लावताना रबरी किवा प्लास्टीक हातमोजेचा वापर करावा.औषध नकात , तोंडात,डोळ्यात,जाणार नाही याची काळजी घ्यावी. बियाण्यास औषध लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हात,पाय,तोंड साबणाने स्वच्छ धोवावे.बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेल्या बियाण्याला कोणत्याही खाद्य पदार्थ म्हणून उपयोग करू नये.यावेळी कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *