भव्य जंगी कुस्तीचा मल्ल पहेलवानानी याचा लाभ घ्यावा;मो.आरिफ मो.लुखमान यांचे आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.८/११/२२ मंगळवार रोजी शालेशा बाबा उर्स निमित्ताने कुस्त्यांची भव्य दंगल ठेवण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे भव्य कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे,दरवर्षी सावळदबारा कातिँक पौर्णिमा नागोबा यात्रा व शाले शहा बाबा उर्स निमित्त कुस्तांची दंगल आयोजित करण्यात येते यात्रा व उर्स उत्सवानिमित्त भव्य कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात येत असते.पण मागील दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, यावर्षी दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्तांची दंगल आयोजित करण्यात आली आहे दि.७/११/२२सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता शालि वस्ताद बाबांचे संदल निघणार आहे या संदल मधे हिंदू, मुस्लिम मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात तर दि.८/११/२२ रोजी वार मंगळवार दुपारी एक वाजता कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कुस्त्याच्या मैदानासाठी महाराष्ट्रातून पुणे,नगर,जालना परभणी, जळगाव, बुलढाणा, चाळीसगाव,औरंगाबाद या राज्यातील विविध जिल्ह्यातून नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहे.कुस्ती खेळताना स्वाताची जवाबदारी स्वातावर राहील पंचकमेटी जबाबदार राहणार नाही.तरी ग्रामस्थांनी व नामावंत मल्लांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आवाहन ग्रामस्थ व पंचकमेटीच्या वतीने मो.आरिफ मो.लुखमान उपसरपंच सावळदबारा यांनी केले आहे.येथे होणाऱ्या या कुस्त्या शिवाजी विद्दालयच्या मैदानावर होणार असल्याची माहिती पण मो.आरिफ मो.लुखमान यांनी सांगितले आहे तरी याचा लाभ मल्ल पहेलवानानी व पचंकोषीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांनी शुद्धा केले आहे.या जंगी कुस्तीला सपोनि देविदास वाघमोडे फर्दापूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अशे मो.आरिफ मो.लुखमान उपसरपंच सावळदबारा यांनी सांगितले.
Users Today : 12