एल. आर. टी. कॉलेजचे माजी एन. सी. सी. कॅडेट शिपाई आशिष तिवारी यांची भेट

Khozmaster
2 Min Read
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी. विभागचे माजी एन. सी. सी. कॅडेट, जो सध्या भारतीय सैन्यात सेवा देत आहे, शिपाई आशिष तिवारी यांनी एन. सीसी युनिट आणि कॅडेट्सना भेट दिली! शिपाई आशिष तिवारी यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन करून कॅडेट्समध्ये काहीतरी करण्याचा उत्साह आणि चैतन्य निर्माण केले. श्रीमती एल. आर. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॅडेट्सना मार्गदर्शन करतांना कॅप्टन डॉ.अनिल तिरकर म्हणाले की, संयम आणि शिस्तीच्या बळावर आज आमच्या महाविद्यालयाच्या एन. सी. सी. युनिटचे अनेक कॅडेट्स भारतीय लष्कर, पोलीस आणि इतर प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत! एन. सी. सी. हे आपल्या भारतीय सैन्यात सामील होण्याची पहिली पायरी आहे! जिथे आपण एकता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढवायला शिकवतो! कॅडेट्सना प्रेरित करतांना सिपाही आशिष तिवारी म्हणाले की, एन. सी. सी. आणि आर्मीचे काम शिस्त आणि एकतेवर आधारित आहे. तसेच कार्यक्रमात एन. सी. सी. कॅडेट्स सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, सी. पी. एल. शिवानी अवातिरक  आणि सार्जंट ऋषिकेश पटेल यांचा गौरव करण्यात आला! ज्यांनी कॉलेजचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे। या कार्यक्रमासाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, सार्जंट जयश्री हरसुलकर, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, सार्जंट श्याम ढोरे, कॉर्पोरल ओम डांगे, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल सागर वानखडे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी पांडे,  कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट किरण माने, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट श्रीकांत वाडोकार, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट सुरज सरकटे, कॅडेट नागेश कचरे‌, कॅडेट रितिक आगरकर, कॅडेट ॠषिकेश शेलार, कॅडेट प्रथमेश तळेकार, कॅडेट प्रणव वानखडे, कॅडेट वैभव कांबळे, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट सर्वेश धांडे आणि इतर सर्व कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली.
0 9 4 5 5 1
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *