शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी ;मा.सभापती धरमसिंग चव्हाण
सोयगाव (प्रतिनिधी)- गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात नादागांव, डाभा, देव्हारी, टिटवी, मोलखेडा, नादांतांडा, घाणेगांव तांडा आदी गावात अगोदरच अस्मानी संकटाने ग्रस्त बळीराजा मेटाकुटीला आला असताना सुलतानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला असता मधातच कपाशी वर लाल्या रोगाने थैमान घातले आहे. परिसरात संपूर्ण शेतकरी सात ते आठ फवारण्या करुनही लाल्या रोग काही शेतकऱ्यांना सोड्याला तयार नाही.परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवणारे कृषी विभाग सोयगाव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी कृषी विभागाकडे केली आहे.अतिवृष्टीने हातचे गेलेल्या सोयाबीन नंतर आता कापसावरील लाल्या रोगाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, यंदाचा पाऊसाचे प्रमाण जास्तच आहे, त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्र मधे हाहाकार माजला आहे. अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या पिकाची नासाडी झाल्याने यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी झाली. त्यात परतीच्या पावसाने ही कोणतीही कसर सोडली नाही.कपाशीचे आकलन करून पिकाबाबत मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात यावे.
अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयगाव कृषी विभागाने खरीपाचे पंचनामे केले.पिकाबाबत योग्य मार्गदर्शन केले.तसेच आता लाल्या रोगाचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केली आहे.
Users Today : 5