आसेगाव पेन येथील कोल्हापूरी बंधाऱ्यातील

Khozmaster
1 Min Read
काडीकचरा कधी काढला जाईल – नारायण पाटील
दिपक मापारी, रिसोड
रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोल्हापूरची बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदाही होत गेला.यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखभाल दुरुस्ती करत आहे.पण कालांतराने पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत गेले व नंतर हे बंधारे देखभाल दुरुस्ती साठी जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आले.दर्वर्षी या बंधाऱ्यात काडीकचरा व लाकडे पूरामुळे वाहून येतात.परंतू बरेच दिवस हा काडीकचरा व लाकडे काढली जात नाहीत त्यामुळे बाजूला असलेल्या जमीनीच्या कडा खरडुन जात आहेत तर बंधाऱ्याच्या भिंतीला ही तडे जात असल्याने बंधाऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी वेळीच काडीकचरा व लाकडे काढले जरुरीचे आहे तरी जलसंधारण विभागाकडून दखल घ्यावी तर भविष्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी गेट टाकावे लागतात.यामध्ये टाकण्यात येणारे गेट हाताने टाकावे लागतात.त्यामुळे गेट टाकण्यास उशीर होतो तर गेट टाकतांना वरुड बॅरेजेस चे गेट आसेगावपेन येथील कोल्हापरी बंधाऱ्यात गेट टाकण्या अगोदर बंद करु नये कारण गेट टाकतांना या बंधाऱ्यात पाणी असते त्यामुळे गेट टाकता येत नाहीत त्यामुळे लिकेजेस राहण्यास मदत होते.करीता पाटबंधारे विभागाचे अधिकारी व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांनी समन्वय साधून गेट कधी टाकता येतील व शेतकऱ्यांचे भले कसे होईल याचा विचार करावा अशी अपेक्षा शिवसेना नेते नारायण आरु पाटील, यांनी व्यक्त केली..
0 9 4 5 5 1
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *