पर्याय नोटा ..
विचार करा जरासा
इलेक्शन खर्चमोठा
गांभीर्याने घ्यावे बरे
कशाला करता थट्टा
चोख हवा उमेदवार
तगडा अन् हट्टाकट्टा
चुकीचा रे प्रतिनिधी
लावेलं नावाला बट्टा
निवडणूक आखाडा
नाही बाताड्या कट्टा
कुणा काय लायकी
काढतो बाहेर चिठ्ठा
निखळ हवा चेहरा
नको खोटा नट्टापट्टा
मातीमध्ये लोळणारं
रे भला चांगला पठ्ठा
पारखू चलनी नाणी
नाही हा जुगारीसट्टा
निवडून देणारं भला
शिक्का नको खोटा
योग्य उमेदवार नाही
पर्याय लाभला नोटा
लक्षात ठेवा नेत्यांनो
आम्हांस शंभर वाटा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996