सावळदबारा येथे नागोबा यात्रा शालिउस्ताद उर्सनिम्मितं आज कुस्तांची दंगल

Khozmaster
3 Min Read

सावळदबारा (प्रतिनिधी)- गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे मंगळवार रोजी नागोबा यात्रा व शालीउस्ताद उर्सनिम्मितं भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.मंगळवारी कार्तिकी पौर्णिमानिमित्त काकडा आरती परिक्रमेमध्ये युवक, बालगोपालंचा सहभाग असतो.प्रात:काळी महिला घरासमोरील रस्ताची साफसफाई करून रंगीबेरंगी रांगोळ्या टाकून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमा खुच्र्यावर प्रतिमेचे पूजन करून काकडा आरतीतील भक्तांना गंधटिळा लावून स्वागत करतात. यात्रा सकाळी सातला हरिहरेश्वर विठ्ठल मंदीरापासून काकडा आरतीला सुरुवात होईल. काकडा आरती गावभर फिरून आल्यावर हारेश्वर मंदिर व नागोबा मंदीरावर प्रसाद वाटप करून सांगता करण्यात येईल. अशी माहिती ह.भ.पा. वासुदेव खडके, ह.भ.पा. आबाराव कोलते, भागवत महाजन यांनी बोलताना दिली.याच दिवशी शालीवस्ताद बाबा यांच्या उरुसानिमित जंगी कुस्त्यांची दंगल दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी सात वाजता शालीवस्ताद बाबांचे संदल हे माजी सरपंच मो.लुखमान मो.शरीफ यांच्या घरापासून सुरुवात करण्यात येते यांच्या घरातून शालीउस्ताद बाबांचे संदल ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत पूर्ण गावात संदल ची मिरवणूक काढण्यात येते.चौका चौकात हिंदू, मुस्लिम यांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गदीँ असते. मुजावर मो. शब्बीर मो. श्ररवर, शे.अमान शेख बिसमिल्ला यांनी माहिती दिली. तर शालीवस्ताद बाबांचे संदलची मिरवणूक पूर्ण गावाभर फिरून झाल्यावर शालीउस्ताद बाबांच्या दर्गाजवळ या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते.मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे उपनिरीक्षक रणजित कासले,बिट जमादार मिरखाँ तडवी,पो.काँ.शिवदास गोपाळ यांच्या कडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत कुस्तीचा कार्यक्रम चालणार आहे. कुस्त्याचे नियम अटी पंचकमेटीचा निर्णय अंतिम राहील.तरी या सोहळाचा कुस्ती पैलवान यांनी आस्वाद घ्यावा व मातीतील कुस्तांचा आनंद घ्यावा असे आवाहन पंचकमेटीचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख, सचिव मो. लुखमान मो. शरीफ, संचालक डॉ. आर. बी. पांडे, उपाध्यक्ष वसंता चोरमारे, शेख.जलील आयु पठाण, प्राचार्य पंजाबराव कोलते, माजी सभापती चुनीलाल चव्हाण, विठ्ठलराव देशमुख, डॉ. जफर सय्यद, सरपंच भाऊराव कोलते, प्रा. सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, डॉ.विठ्ठल कोते,मधुकर पुजारी, नरेश देशमुख,मनोहर जगताप, मा.सरपंच समाधान सुरडकर, मा.सरपंच मेहताब सांडू,तंटामुक्तीचे अध्यक्ष मुकुदा मानकर पंचकमेटीचे मान्यवर उपस्थित होते.अशी माहीती मो. आरिफ मो. लुखमान,प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यानी बोलतांना दिली.सदरील भव्य कुस्तीचा कार्यक्रम शिवाजी विद्दालयाच्या मैदानावर होणार आहे तरी कुस्ती प्रेमी, पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे प्रा.जीवन कोलते पाटील यांनी केले आहे.

 

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *