कृषी विभाग मंडळ अधिकारी यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील टिटवी-पळसखेडा येथे सोयगाव कृषी विभागाचे वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ सोयगाव यांनी पळसखेडा येथे येऊन एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत पळसखेडा येथे कृषी विभागाकडून दि.१/९/२२ गुरुवार रोजी संध्याकाळी सात वाजता मराठवाडा व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांच्या नैराश्य व त्यातून उद्द्वणाऱ्या आत्महत्या यावर प्रभावीपणे उपाययोजना करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत तसेच बळीराजा सुखाचे दिवस यावेत याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी”उपक्रम माजी सभापती सांडू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक एम.आर.भोळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना असे म्हटले की,गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, कीटकनाशके हाताळताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत सखोल असे मार्गदर्शन केले. आणि कृषी आत्मा पर्यवेक्षक ए.एस.महाजन, कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख,ऐ.जे.पाटील, यांनी पळसखेडा गावातील शेत शिवारातील पिंकाची पाहणी केली. शेताच्या वाहत्या पाण्यातून जाऊन शेताच्या बांधावर वाट काढून शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली.अशा प्रकारे सोयगाव कृषी विभागाने सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजी सभापती सांडू तडवी, सरपंचपती भागवत जाधव, उपसरपंच लहू प्रेमसिंग राठोड, मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिलावर्ग व शेतकरी यांच्याउपस्थित”माझा एक दिवस बळीराजासाठी”उपक्रम सोयगाव कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रम पार पडला.
Users Today : 16