सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथे गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून पुर्ण झालेल्या घरकुल कामाची केली पाहणी करुन लाभार्थ्याना दिला गृह प्रवेश

Khozmaster
1 Min Read

सोयगाव तालुका गोकुळसिंग राजपुत सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथील भूमीहीन व गरजू असलेले विधवा घरकुल लाभार्थी पार्वताबाई बाबूराव चव्हाण यांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असता ते पूर्ण झाले किंवा नाही या कामाची पाहणी करण्यासाठी दि.०३/११/२२ गुरुवार रोजी ग्रामविकास अधिकारी सुधीर भालेराव स्वत: येऊन पाहणी करून त्यांना गृहप्रवेश करून दिला.सोयगाव तालुक्यातील घरकूल लाभार्थीच्या बांधकामांची सोयगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी,इंजिनिअर ईश्वर शिंदे,व ग्रामसेवक सुधीर भालेराव यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच स्वाती भाऊराव कोलते पाटील,व त्यांचे पती भाऊराव कोलते व उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,ग्रा.प.सदस्य मोहन सुरडकर ग्रामपंचायत शिपाई अनिल राजपूत, सुभाष मानकर पाणीपुरवठा कर्मचारी,रोजगार सेवक संजय नप्ते,अमोल राऊळकर,आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विधवा घरकुल लाभार्थी पार्वताबाई चव्हाण, गजानन चव्हाण, चंदाबाई चव्हाण यांनी आपल्या हक्काच्या घरकुलात प्रवेश केला. त्यावेळी सर्व लाभार्थ्यानी सावळदबारा ग्रामपंचायतीचे यावेळी आभार व्यक्त केले.

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *