सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव कृषी विभागामार्फत कपाशी पिकांवर लाल्या हा रोग नसून अन्नद्रव्य कमतरते मुळे उद्भवणारी समस्या आहे यावर्षी अतिवृष्टी मुळे जमिनीत टाकलेली खते ही वाहून गेली त्यामुळे कपाशी पिकाला अन्नद्रव्य कमतरता झाल्यामुळे कपासाची पाने लाल झाली आहे यामध्ये प्रामुख्याने लाल्या जमिनीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो कपाशीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरिद्रव्य नष्ट होऊन अँथोसायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे कपाशीची पाने लाल पडल्यासारखी दिसतात. त्यांचा रंग लाल होतो व शेवटी प्रादुर्भाव झालेली पाने गळून पडतात तसेच कपाशीवरील पाते, फुले ही गळून पडतात.कपाशीला बोंडे भरणे, पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.जर कपाशीवर लाल्या रोगाची लक्षणे दिसू लागल्यास 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून शिफारसीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात किंवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.असे कृषि सहाय्यक मानसिंग भोळे,सतीश बोरसे यांनी सांगितले
Users Today : 12