जंगलातांडा येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

Khozmaster
1 Min Read

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरण मिटवावे;सपोनि देवीदास वाघमोडे यांचे आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा सोयगाव तालुका विधी सेवा समिती तथा सोयगाव तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६/११/२२ रविवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय जंगलातांडा येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.जनजागृती नागरिकांचे स्वामीकरण करणेकरीता दि. ३१.१०.२०२२ ते १३.११.२०२२ कालावधी दरम्यान कायदेविषयक शिबीर घेण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती तथा सोयगांव वालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वरील कालावधीमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालय, जंगलावाडा येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये तालुका विधी सेवा समिती अध्यक्षमा न्यायाधीश अमोल भा. इंगोले यांनी विधी सेवा प्राधिकरणाबद्दल नागरीकांना माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे फर्दापूर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी दिवाणी व फौजदारी कायद्यामधील काय फरक आहे. हे ग्रामस्थांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे सोयगांव विधीज्ञ संघाचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. आर.एस. महाजन यांनी स्त्रियांचे काही अधिकार या बद्दलच्या कायद्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमात यावेळी अँड.राजेश(भैय्या)गिरी, जंगलातांडा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबु चव्हाण,ग्रामसेवक एन. के., गोरे न्यायालयीन कर्मचारी एन.पी. साडे, व यु.जी. काशिदे तसेच गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांडू राठोड यांनी केले.

0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *