खोके सम्राट अब्दुल मोकार यांनी तात्काळ सुप्रियाताईची माफी मागावी नसता राष्ट्रवादीच्या रणरागिनी तुझे महाराष्ट्रात फिरणे अवगड करतील – निलाताई पोकळे

Khozmaster
1 Min Read

पाटोदा (गणेश शेवाळे)अरे खोके सम्राट अब्दुल मोकार पैश्यासाठी पक्ष बदलताना तुम्हाला सर्व महाराष्ट्राने पाहिले असून 50 खोके एकदम ओके आशी ओळख तुमची महाराष्ट्रभर असताना महिले बद्दल बोलत आहात याच जरा भान ठेवा बोलताना तुमच्या आई-बहीण-लेकीला असं बोललं तर चालेल का ? शेतकऱ्यांवर आलेल्या आसमानी संकटामुळे तुम्ही त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे सरसकट शेतकऱ्याला मदत जाहीर करावी अशी मागणी केली तर तुमच्या हेवढे काय पोटात दुखले तुम्हाला जर एवढा सत्तेचा माज ते पण इतक्या लवकर आला आहे तर तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही सुप्रियाताईच काय कोणत्याही महिलेला जर अशा अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्याला आता राष्ट्रवादी महिला कॉग्रेस माफ करणार नाही. मग तो कोणीही असो मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो आता माफी नाही राष्ट्रवादीच्यि नेत्या संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताईंबद्दल जे अशोभनीय आणी बेताल वक्तव्य केले आहे. हा फक्त सुप्रियाताईंचा अपमान नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे. आपण तात्काळ आदरणीय खासदार ताईंची जाहीर माफी मागावी नसता, सुतार साहेब तुम्हाला राष्ट्रवादी महिला काँग्रेस राज्यात रस्त्यावर फिरू देणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निलाताई पोकळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *