शेंदला येथे ऋषी पंचमी निमित्त महाआरती चेआयोजन संपन्न सतिश मवाळ

Khozmaster
1 Min Read

मेहकर तालुक्यातील शेंदला  संत गजानन महाराज संस्थान शेंदला या ठिकाणी  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  ऋषी पंचमी निमित्त  गजानन महाराज महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी योगायोगाने हा उत्सव सोहळा गणपती उत्सव मध्ये आला..  संत  गजानन महाराज सेवा समिती शेंदलाचे भक्तजन दरवर्षी गणपती उत्सवात सर्व धर्म समभाव   गणपती उत्सव सोहळा साजरा करत असतात.  गणपती उत्सवात दररोज आरतीचा सन्मान हा देशसेवेत कार्यरत असणाऱ्या कुटूंबाला देत असतात   व गुणगौरव करीत असतात याही वर्षी तीच परंपरा कायम आहे. यादिवशी  पोलीस सेवेत psi पदी कार्यरत असलेले गजानन प्रभाकर रहाटे यांच्या कुटूंबाला देण्यात  आला. यावर्षी  गणपती उत्सवात ऋषी पंचमी सोहळा उत्साहात साजरा झाला. महाआरती चे आयोजन करण्यात आले  होते. महाआरती ला प्रमुख अतिथी म्हणून  गटविकास अधिकारी लोणार  गजानन पाटोळे साहेब त्यांच्या धर्मपत्नी सौ दुर्गाताई पाटोळे व प्रथमेश स्टाईल चे संचालक दत्तात्रय गिरहे हे प्रामुख्याने उपस्थित होते.   यावेळो गावातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य महिला व पुरुष भक्तजन ,महिला भजनी मंडळ ,पुरुष भजनी मंडळ उपस्थित होते.    ऋषी पंचमी सोहळा यशस्वी होण्यासाठी  सेवा समितीचे  सर्व सेवाधारी   शिलेदार  व भक्तजन यांनी परिश्रम घेतले.

0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *