औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद जिल्ह्यातील राहणार मालेगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद हा मुलगा शिवना नदीमध्ये पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही माहिती औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलास मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्या तासाच्या आत मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या आदेशानुसार उप अग्निशमन आधिकारी डी.डी. साळुंके, अग्निशमन दलाचे पथक ड्युटी ऑफिसर एल. पी. कोल्हे, अग्निशामक सुजित कल्याणकर, मयूर कुमावत, विक्रम भुईगळ, किरण पागोरे, संग्राम मोरे, दिनेश वेलदोडे, अक्षय नागरे, शंकर दुधे आदींनी ही कामगिरी पार पाडली.
Users Today : 12