फर्दापूर : 17 वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

Khozmaster
3 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली घटना जगात सर्वश्रेष्ठ  व तालुक्यातील फर्दापूर येथील अजिंठा लेण्याच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली संस्थेच्या जवळपास 75 एकर जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्यासह येथे व्यापक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची जागा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वोतोपरी मदत करू असे प्रतिपादन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर येथील 17 वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद प्रसंगी बोलतांना केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे स्पष्ट करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळेच माझ्या सारख्या अल्पसंख्याक समाजाचा माणूस मंत्री झाला असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.      फर्दापूर ( ता. सोयगाव ) येथे आज 17 वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन अमेरिका येथील भिक्खु लामा रंगड्रोल यांच्याहस्ते संपन्न झाले. परिषदेच्या अध्यक्षतेस्थानी जपान येथील भिक्खु ताईजो इमानाका होते. परिषदेस धम्मसेवक भन्तेजी चंद्रबोधी महाथेरो, सेवानिवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, सिल्लोड तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, सिल्लोड नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, सोयगाव नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, सिल्लोड उपनगराध्यक्ष तथा युवानेते अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष संजय आरके, नगरसेवक जितू आरके, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सतीश ताठे, विशाल जाधव, संजय मुरकुटे, माजी उपसभापती उस्मान पठाण, अक्षय मगर, रवींद्र बावसकर यांच्यासह देश – विदेशातील भन्तेजींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.     पुढे बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे शिवस्मारका सह – भीमपार्कच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. भीमपार्क उभारणी कामात भन्तेजी चंद्रबोधी महाथेरो यांनी सहभाग घ्यावा. फर्दापूर पाली सेंटरच्या बाबत मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून मुंबई येथे बैठक बोलावू असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. गेल्या वर्षी झालेल्या धम्म परिषदेत येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही मी दिली होती. येथील रस्त्याचा तिढा सुटल्याने आता रस्त्याच्या कामासह विकास कामांना गती येईल असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.यावेळी संस्थेच्या धम्माचल स्मरणिका व बुद्ध संदेश मासिकेचे प्रकाशन मंत्री अब्दुल सत्तार व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील बौद्ध मूर्ती स्थळी तसेच आलेल्या उपासकांसाठी आयोजित भोजनदान कक्षेला भेट दिली.

 

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *