डोणगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंदविलेले पत्रकारवरील
गुन्हे खारीज करा
सतिश मवाळ
मेहकर तालुक्यामधील बेलगाव येथील पत्रकार दीपक देशमुख यांनी दिलेल्या अर्जानुसार संबंधित गैर अर्जदार कायदेशीर कार्यवाही करून पत्रकार संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हे नोंद करावी यासाठी मेहकर तालुक्यामधील सर्व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निवेदन.
बेलगाव येथील पत्रकार / वार्ताहर दीपक देशमुख यांनी बेलगाव येथील शाळेमधील प्रकारा संदर्भात बातम्या प्रकाशित केल्या असता बातम्याचा आकस बाळगत असताना, शाळेमधील कर्मचाऱ्यांच्या गैर पार्क प्रकाराबाबत आपबीतीची हकीगत शोधण्यासाठी व मुख्याध्यापकाकडून खुलासा घेऊन बातमी घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना बातमी न देता खुलासा सादर न करता त्यांना मारहाण शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले. दि.५ ऑगस्ट रोजी पत्रकार व त्याचे काका मोटर सायकलने बाहेरगावी जात असताना अर्जातील गैर अर्जदारांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्या खिशातून एक लाख रुपये काढून, जीवे मारण्याची धमकी देऊन, पसार झाले. पत्रकाराच्या कर्तव्यावर बाधा आणून , पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी, त्यांच्यावर डोणगाव पोलीस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. समजतात घडलेली हकीगत ही डोणगाव पोलीस स्टेशनला न देता ऑनलाइन अर्ज तसेच पोस्टाने माननीय जिल्हाधिकारी व उपयोगी अधिकारी यांना संबंधित गैर अर्जदारावर कारवाई करण्यासाठी अर्ज केला असता अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याने. विविध पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे.
पत्रकार दीपक देशमुख यांना मारहाण ,शिवीगाळ, बातमीसाठी सहकार्या न करता, पत्रकाराचा आवाज दाबुन, पत्रकाराच्या कर्तव्यावर बाधा आणून, लुटल्याप्रकरणी दिलेल्या अर्जानुसार अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याने,
मेहकर तालुक्यामधील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना ,स्वराज पत्रकार संघटना, वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मेहकर तालुक्यामधील सर्व पदाधिकारी ,सर्व पत्रकार बांधवांनी दिलेल्या निवेदनाद्वारे संबंधित गैर अर्ज दरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करावी व दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित खरीद करण्यात यावे. अन्यथा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन दि.१ सप्टेंबर रोजी मेहकर तहसीलदार मार्फत मा. जिल्हाधिकारी, गृहमंत्री, बुलढाणा पोलीस अधीक्षक,व इतरांना, मेहकर तालुक्यामधील सर्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी पत्रकारांनी सह्याचे निवेदन सादर केले
Users Today : 36