गुरुजींच्या कानी पडणार पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जि.प.मराठी शाळेत दिपावलीच्या दिर्घ सूट्या नंतर आज औरंगाबाद जिल्हयातील शाळेत शालेय परिसर पुन्हा विद्यार्थ्यांनी फूलणार असून सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात देव्हारी, टिटवी, डाभा, मोलखेडा, सावळदबारा सह शाळा दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी शाळेची घंटा वाजली आहे. या आनंदा मुळे विदयार्थ्यांचा किलबीलाट पुन्हा गुरुजीच्या कानी पडणार आहे. बुधवारी सोयगाव तालुक्यातील सर्वच शाळा सुरु होत असल्यामुळे विदयार्थ्यां सह पालक वर्गात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. सविस्तर वृत्त असे की, सोयगाव तालुक्यातील सर्व शाळानां दिपावलीची सुट्टी जाहिर झाल्याने शालेय मुलांना आनंद झाला होता. आता आपण मामाच्या गावाला जाणार व मज्जाच मज्जा करणार
या ऊत्साहाने शालेय मुला बरोबर गुरुजनांना पण दिपावलीच्या सुट्ट्यांचा आनंद उपभोगता येणार म्हणून अनेकांनी देव दर्शन व प्रेक्षनिय स्थळांचे नियोजन करून आनंदत्सव केला. त्या नंतर विस दिवशाच्या शालेय सुट्याचा मंगळवार शेवटचा दिवस ठरला आणि दि.९/११/२२ बुधवार रोजी सकाळीच जि.प.मराठी शाळेत केंद्र प्रमुख एम.डी.सोनवणे यांनी घंटा वाजवली परिसरात सर्वत्र शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेल्याने आनंद झाला. आज शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांची गदीँ होणार या आनंदात आज शालेय परिसरात मुलांची गदीँ होणार असल्याने शालेय परिसरात आंनदी वातावरण पाहायला मिळाले.
Users Today : 12