राजपूत/परदेशी समाजाविरुद्ध च्या कुरापती थांबवा;धोंडीराम राजपूत..

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद,या देशाचे मूळ रहिवाशी आदिवासी जनजातीचे नागरीक व  राजपूत /परदेशी समाजाचे नागरिक आहेत ,राजपूत/परदेशी भटके समुदायात मोडतात, तत्कालीन समयी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणे व उदर निर्वाह करणे,ही त्यांची जीवन पध्दती होती,हे मूळचे जरी राजस्थान चे असले,तरी भटकत, स्थलांतर करीत हे सर्व देशभर विखुरलेले आहेत,या भटकंती मुळे ते शिक्षण पासून कालही दूर होते व आजही दूर आहेत त्यांना शिक्षणाचा गंध ही  नव्हता,मात्र प्रखर राष्ट्रनिष्ठ,राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम त्यांच्या ठायी -ठायी होते जे आजही त्याच्या रक्तात टिकून आहे,कृतीतव कर्मात टिकून आहे,देशाच्या मातीशी एकनिष्ठ असणारा हा समाज आजही अत्यंत मागास आहे,या समुदायातील मुलांनी /मुलींनी शिकावे ,उच्च शिक्षण घ्यावे व आपल्या कुटुंबाची ,आपल्या समाजाची उन्नती साधावी या साठी महाराष्ट्र सरकारने त्यांना विमुक्त जातीत समाविष्ट केलेले आहे, यामुळे आज या समाजाची मुले–मुली शिकत आहेत,उच्च पदावर देशाची सेवा करीत आहेत, या देशाच्या मातीची व भारतमातेची मनोभावे सेवा करीत आहेत, हे काही विघातक , स्वार्थी ,व आपमतलबी राजकारण्यांना पाहवत नाही,या समाजाची उन्नती व विकास पाहवत नाही,तसेच हे काही राजकारणी मंडळींच्या व काही विघ्नसंतोषी च्या डोळ्यात खुपत आहे, म्हणून ते सारखे सरकारला या राजपूत/परदेशी समाजाला सोयी-सवलती नको म्हणून खाजवत असतात त्यांनी जाणून घ्यावे की या देशाचे मूळ रहिवासी हे राजपूत/परदेशी आहेत या देशाच्या प्रत्येक बाबींवर त्यांचा आधी अधिकार आहे.त्यांनी या देशाच्या मातीशी एकनिष्ठ राखलेली आहे. या माताशी नाळ प्रथम त्यांची आहे. त्यांच्या विरोधात काड्या करणे म्हणजे या देशाशी या देशाच्या मातीशी बेईमानी करणे होय त्यांनी या काड्या करणे थांबविले नाही तर समाज अन्याय, जुलम विरुद्ध पुन्हा पेटुन उठेल, शासनाने हि अशा विघ्नसंतोषी व विघातक वृत्ती च्या लोकांना त्वरित आवरायला हवे अशी विनंती धोंडीराम ध राजपूत, वैजापूर जिल्हा औरंगाबाद मो.9421312244 यांनी सरकारला केली आहे.
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *