लगीन घाई ..
कडीलावते आतली
मी ना त्यातली बाई
जिभेने केले दुश्मन
टपून बसे ठाई ठाई
दिवस आले विचित्र
खावी वाटते खटाई
असह्य झाल्या कळा
रे काय करणारं दाई
उगा बोले काहीबाही
डोक्यां नको कल्हाई
स्वच्छ धुतले चरित्र
अंगास आली भलाई
उगाचं ताण ताणले
उसवूलागली शिलाई
पोट फुटे पर्यंत कशी
रे खा खाल्ली मिठाई
रे फुशारक्या मारल्या
खुशाल कर कारवाई
घरात घुसले पाहुणे
मुली सोबत जावाई
उघडी ठेवली कवाडे
कुणा ना केली मनाई
धाडीवर पडती धाडी
चालणार लगीन घाई
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996