सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात सध्या रब्बी हंगाम पेरणी चालू झाली आहे रब्बी हंगामात शेतकरी ज्वारी हरभरा गहू मका या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात पेरणी चालू असताना कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बहुलखेडा, कवली ,नांदगाव ,तिडका परिसरात पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, जमिनीतील व हवेतील अन्नद्रव्य स्थिरीकरण करणारे जिवाणू हे बियाण्याला प्रति किलो 4 ग्रॅम याप्रमाणे हलक्या हाताने चोळून बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी बीज प्रक्रिया केल्याने जमिनीतून पिकांच्या मुळावर येणारी बुरशी थांबते त्यामुळे मुळ्यांचा जमिनीत विकास होऊन अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. परिणामी पिक जोमाने वाढते एकंदरीत उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्यास मदत होते अशी माहिती कृषी सहाय्यक सतीश बोरसे व सचिन पाटील यांनी दिली व शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.
Users Today : 12