एनटीव्ही च्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य कौतुकास्पद-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Khozmaster
2 Min Read
समाजातील वास्तविक चित्र प्रदर्शित करणारा हा अंक-मा.राज्यमंत्री बच्चू कडू
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
महाराष्ट्राची आग्रगण्या व्रत्तवाहिनी, जनमानसाचा प्रतिबिंब म्हणून ओळखली जाणारी मराठी व्रत्तवाहिनी Ntv न्यूज मराठीच्या दीपावली विशेषांक २०२२ चा “वास्तव दी रिऍलिटी” या अंकाचे राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,शिक्षण मंत्री तथा पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि माजी राज्यमंत्री तथा प्रहार जणशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू भाऊ कडू यांच्या हस्थे मोठ्या थाटात दिनांक  ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात पार पडला.
          सालाबाद प्रमाणे यंदा एन टी व्ही वृत्तवाहीनीने आपल्या असंख्य प्रेक्षक तथा वाचकांसाठी देशातील वास्तव चित्र रेखाटत,”वास्तव द रिऍलिटी” या शीर्षकाखाली दीपावली अंक प्रकाशित केला.या अंकाचे प्रकाशन मुंबई-मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,शिक्षण मंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू भाऊ कडू,उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले,बच्चू भाऊ यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी आणि Ntv वृत्तवाहिनीचे संपादक एकबाल शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी विविध विभागाचे सचिव,स्वीय सहाय्यक यांच्यासह विविध मान्यवर,एन टी व्ही विभागीय प्रतिनिधी सचिन बिद्री,उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी अयुब शेख आणि राज्यभरातून आलेले दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपास्थित होते.दरम्यान या प्रकाशन सोहळ्यात एन टी व्ही च्या माध्यमातून पत्रकारितेसह सचिन बिद्री यांचे होणारे सामाजिक कार्य, विशेषतहा बालविवाह रोखून मुली व मुलींच्या पालकांत शिक्षणाबाबत होणारी जणजागृतीबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व बच्चू कडू यांनी कौतुक करीत पाट थोपटली.
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *