सहा रुग्णांवर खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा गावात डेंगूणे एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.प्रमोद प्रेमसिंग चव्हाण असे डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे तर अर्णव प्रेमसिंग चव्हाण वय(७) मानवी प्रेमसिंग चव्हाण वय(१५)विक्रम विलास चव्हाण वय(११)कुणाल राजू राठोड वय(१२) प्रवीण बद्री राठोड वय(१४) किसन रामदास राठोड वय(१५) या डेंगूच्या सहा रुग्णांवर पाचोरा सोयगाव व शेंदुर्णी येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत विशेष म्हणजे डेंगूने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये पंधरा वर्षाच्या मुलांची संख्या अधिक असल्याने येथील नागरिकांमधून ग्रामपंचायत प्रशासना विरोधात गावात ठिकठिकाणी नालीचे पाणी साचून निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळेच जंगलातांडा गावात डेंगूची साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहेया घटनेची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीनिवास सोनवणे, यांच्यासह पथकाने गावात सर्वेक्षण केले
Users Today : 12