वाहाळा बु. येथील उद्धव ठाकरे समर्थकावर हल्ला;

Khozmaster
1 Min Read

पातूर प्रतिनिधी

 

पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेला वाहाळा बु. येथील शिवसेना शाखा प्रमुख रामहरी शिवराम पल्हाड यांच्यावर प्राण घातक हल्ला करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवासांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये वाद होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहाळा बु येथील राजकीय वातावरण तापले आहे. वाहाळा बु येथील शिवसेना शाखा प्रमुख रामहरी शिवराम पल्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. रामहरी पल्हाड जखमी झाले आहे.

 

भगवान पुरी संस्थान या चौकात रामहरी पल्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. आकाश महादेव भोकरे व त्यांच्या भावाने शुभम महादेव भोकरे यांनी हातातील कडेने वार करून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यात रामहरी पल्हाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करून मेडिकल करण्यात आला. तसेच, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आहे.

फिर्यादी यांच्या दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम महादेव भोकरे व त्यांचा भाऊ आकाश महादेव भोकरे यांच्यावर कलम 324,504,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूआहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *