पं नेहरूजी ..
पंतप्रधान देखणा
नेहरू जवाहरलाल
कोमल नितळ मन
केले त्यांना बहाल
लाडके होते सर्वांचे
तरूण वृध्दआबाल
पिढ्या देशाकरिता
झटल्या सालोसाल
जन्म दिन बालदिन
मुलात रमे खुशाल
साहित्यसंगीत प्रेमी
कविमन ते विशाल
तुरुंगवास सोसला
सोडून छान महाल
तोंडात चांदीचमचा
तरीही सोसले हाल
दीन दलीता करिता
झाले कोमलरुमाल
पांघरूण वंचितांचे
बनले कश्मिरीशाल
दूर दर्शी दिव्य दृष्टी
विचारशक्ती कमाल
मवाळ होती क्षणात
टिकाकार ते जहाल
प्रियशिष्य बापुजींचे
हृदय भलते विशाल
आठवण कोंदणीत
राहे हिरा बेमिसाल
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com